Pregnancy

नातं…. तुझं नि माझं


नातं.... तुझं नि माझं

नातं…. तुझं नि माझं. तुझ्या मनाच्या अंगणात पडलेलं माझ्या मनाचं शुभ्र चांदणं, पोर्णिमेच्या रात्रीसारखं निखळ, स्वच्छ आणि शीतल.

पती-पत्नीचं नातंच जगावेगळं असतं. ज्यात प्रेम, राग, लोभ, क्रोध असे एक ना अनेक भाव आहेत. एक असं नातं जे जीवनाच्या सुरवातीला आपल्या सोबत नसतं परंतु जीवनाच्या अंतापर्यंत फक्त तेच आपल्यासोबत राहतं. निःसंशय आई-बाबा, भाऊ-बहीण, मुल-बाळ, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक हे आयुष्यात खूप महत्वाचे आहेत पण ह्या नात्यात काही वेगळीच मजा आहे.  आयुष्याच्या एका टप्प्यावर एक एक करून नाती जेव्हा हातातून निसटायला लागतात त्यावेळी एक हात आपल्याभोवती घट्ट असतो, तो म्हणजे आपल्या जोडीदाराचा.

ह्या नात्याची सुरुवातच मुळी वेगवेगळ्या संमिश्र भावनांनी होते. तो आणि ती एका अजब दुनियेत असतात जिथे त्यांना स्वतःच्या अपेक्षासोबत एकमेकांच्या आणि इतरांच्या अपेक्षा पूर्तीची सांगड घालावी लागते आणि मग सुरू होते रस्सीखेच. आणि त्यातुन येतात कडू-गोड अनुभव.

ही आहे एक कठीण परीक्षा. इतरांना जपताना त्या दोघांचं नातं कुठेही कोमेजून जाऊ नये म्हणून द्यावी लागणारी परीक्षा. आणि ही तोंडी परीक्षा असते बरं का! इथे काही प्रश्नांची उत्तरं देणं बंधनकारक असतं तर काही प्रश्न अनुत्तरित ठेवण्यातच जास्त शहाणपण. पण कधी कधी आपल्याला समजतच नाही कोणता प्रश्न अनुत्तरित ठेवायचा आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मग सुरू होते गफलत, प्रश्नाची, नात्याची, त्या दोघांची. पण त्यात एक भावना  मात्र ठाम असते ती म्हणजे शेवटपर्यंत साथ देण्याची भावना. एकमेकांना पूरक होण्याची भावना आणि तेच आपलं टॉनिक बनतं ह्या प्रवासात आलेल्या कटू अनुभवाच्या आजारांना दूर पळवण्यासाठी.

पती पत्नीचं नातं हे प्रेम अन विश्वास या दोन गोष्टींवर अवलंबून असते. कधी कधी प्रेम असते पण विश्वासाची कमी नातं कमजोर करते तर कधी प्रेमच नसतं तर विश्वासाची गोष्टच खूप दूरची होऊन जाते. आपण आपल्या जोडीदारावर दाखवलेला विश्वास अन प्रेम दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. काल भेटलेले दोघे जेव्हा आयुष्यभर एकमेकांना साथ देत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात तेंव्हाच किंबहुना त्याच क्षणी सुरू होतो तुमचा तुमच्या जोडीदारावरच्या प्रेम आणि विश्वासाचा प्रवास.कित्येक क्षण असे येतात की हा विश्वास हे प्रेम डळमळीत तर नाही ना असा विचार येतो आणि तीच खरी वेळ असते त्याला आणखी दृढ करण्याची.

पती-पत्नीचं नातं म्हणजे प्रेमाचा सूर, भांडणाचा ताल अन अबोला-दुराव्याच्या लयीत घट्टपणे माळलेल्या रागांची मैफल च जणू. जगात कोणीही कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवत नाही तेवढ्या आपण सगळे आपल्या जोडीदाराकडून ठेवत असतो. ते पूर्ण झाल्या की समजायचं आपलं हे गाणं हिट आहे नाहीतर सगळंच अनफिट.

आपल्या नात्याचा बहर आपण च निश्चित करायचा असतो. नातं सुंदरपणे टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना सारखीच दाद द्यावी लागते. एक करतोय तर दुसऱ्याने मागे राहून कसं चालेल? माझ्यासाठी जसा/जशी तू तसंच तुझ्यासाठी सदैव मी सगळ्यात आधी असेल हा विश्वास आपल्या नात्याची रेशीमगाठ  कधी सुटू देत नाही तर उलट आणखी घट्ट करतो.

तुम्ही जेव्हा जोडीदारावर खूप मनापासून प्रेम करता मग त्यासाठी काहीही करायची तयारी तुमची तयारी असते. मग त्यासाठी तुम्ही बोलता आणि बोलून पण घेता परंतु एवढं करून ही जर तुम्हीच त्याच्या नजरेत चुकीचे असाल, तुमचं बोलणे, तुमची काळजी करणं समजत नसेल तर समजून जा की समोरच्या च्या मनात प्रेम नव्हे फक्त एक व्यवहार आहे. केवळ व्यवहार आणि व्यवहारावर व्यवसाय सुरळीत चालतो.संसार नाही.

म्हणून जोडीदारावरच प्रेम हे नेहमी वाढत जाणारं असावं आणि विश्वास नेहमी अढळ असावा.आपल्या हक्काच्या माणसावर विश्वास ठेवा आणि भरभरून प्रेम करा.
“नातं कसं एकदम हॉट असावं” म्हणजे प्रेमाची उब असावी अन विश्वासाचा ओलावा असावा म्हणजे कसं मुलायम वाटतं आणि आपण आपोआप एकमेकांचे आधार बनून जातो.

Disclaimer: The perspectives, critiques and positions (together with content material in any shape) expressed inside of this publish are the ones of the creator on my own. The accuracy, completeness and validity of any statements made inside of this text aren’t assured. We settle for no legal responsibility for any mistakes, omissions or representations. The duty for highbrow belongings rights of this content material rests with the creator and any legal responsibility when it comes to infringement of highbrow belongings rights stays with him/her.

Warning: count(): Parameter must be an array or an object that implements Countable in /home/quickezweightlos/public_html/wp-content/plugins/ultimate-author-box/inc/frontend/uap-shortcode.php on line 119
style=”display:none;”>
admin Administrator
Hi, This is Admin of the site. We are working hard to improve the content. Please share your suggestions and content if you have.
×
admin Administrator
Hi, This is Admin of the site. We are working hard to improve the content. Please share your suggestions and content if you have.

Comment here